Thursday, June 29, 2017

मधुर मनोहारी, सुंदरशी
एक कविता बनलीयस तू.
आवडतेस तर खूपच
पण अजूनही अनाकलनीयच तू.
सचिन खमितकर । 17/06/2016
काळ बदलला,
की बदलली वेळ?
नशीब म्हणायचं,
की नियतीचा खेळ?
जीच्यासोबत बागडलो,
मी स्वप्नील रंगांच्या नभी.
परक्यांच्या रांगेत ती,
होती सर्वात पुढे उभी.
सचिन खमितकर

Saturday, August 20, 2016

तुझ्या आठवणींमागे

तुझ्या आठवणींमागे,
मन वेडं पळत असतं.
नजरेतून बोलताना,
ते तळमळत असतं.

ओझरत्या स्पर्शाची,
कल्पनेतल्या हर्षाची,
उत्तुंग मनोरे बांधून
ते सळसळत असतं.

जमीन आकाशाशी,
भेटेल तरी कशी?
गणित अंतराचं,
सगळं कळत असतं.

समाजाच्या स्पंदनाला,
निष्ठुर त्या बंधनाला,
झुगारून देता देता
मनामध्येच जळत असतं.

तुझ्या आठवणींमागे,
मन वेडं पळत असतं.


सचिन खमितकर